सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक यांची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे इसमांवर धडक कारवाई..
मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक यांची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे इसमांवर धडक कारवाई..
मा. श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदार यांनी दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे इसमांवर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
1) पोलीस स्टेशन विमानतळ सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चाली क्रमांक दोन मधील पोलीस अंमलदार यांना शिवमंदीर परिसरात 02 इसम हे मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.
2) दामिनी पथक दामिनी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान यशवंत कॉलेज परिसरात 04 इसम हे आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांचेवर पोस्टे शिवाजीनगर येथे कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये तसेच दारू पिणाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देवू नये व सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अन्यथा संबंधीत इसमांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले आहे



