ताज्या घडामोडी

प्रज्ञा विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ शपथविधी व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न*

मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

*प्रज्ञा विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ शपथविधी व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न*

नवचैतन्य मित्र मंडळ संचलित, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाची आठव्या वर्षीची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाही पद्धतीने दिनांक 18/8/2025 ते 28/8/2025 या कालावधीत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाहीचे शिक्षण देत असताना प्रत्यक्ष कृतीतून, स्वानुभवातून शिक्षण मिळावे व लोकशाहीचा उत्सव काय असतो ते विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने हा उपक्रम विद्यालयात दरवर्षी घेण्यात येतो.यामध्ये निवडणुकीची
अधिसूचना, मतदारयादी प्रसिद्धी, उमेदवारी अर्ज भरणे, चिन्ह वाटप, प्रचार करणे, आचारसंहिता पालन , प्रत्यक्ष मतदान, निकाल, मंत्रिमंडळाचा शपथविधी,या सर्व प्रकिया मुलांना अनुभवता आल्या. दिनांक 23/8/2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने मतदान घेण्यात आले. भारतीय संविधानाचे पूजन करून मतदान सुरू करण्यात आले.यावेळी संचालक श्री. शरणम गायकवाड, श्री. प्रल्हाद जगताप, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे, प्रज्ञा शिशु विहारच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली नाईक, शिक्षक पालक संघातील सदस्य , निवडणूक अधिकारी श्री. ऋषिकेश पळसे, व श्री. सुहास गवळी सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते.
मतदाना दिवशी मतदान बूथ तयार करण्यात आले होते, मतदान अधिकारी १,मतदान अधिकारी २, मतदान अधिकारी ३, केंद्राध्यक्ष म्हणून इयत्ता ७ वी मधील स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी कामकाज पाहिले. यामध्ये इयत्ता ४ थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मतदाराची भूमिका बजावली 396 एकूण मतदारांपैकी 367 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व 92.68% एवढे मतदान झाले. इयत्ता सहावी सातवीचे एकूण 16 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात होते. त्यामधून आठ उमेदवार विजयी झाले. यामधून गणेश केशव तांदळे ( 209 मते)मुख्यमंत्री,
अर्चिस्मती दिनेश सरोदे (186 मते) उपमुख्यमंत्री, लावण्या सिद्धेश्वर लाळे (252मते) शिस्त मंत्री, आरोही संतोष हिंगणे(207मते) अभ्यास मंत्री, विराज गुरुबाळाप्पा बिराजदार (155मते) क्रीडामंत्री, आदर्श पालापुरे (154मते)स्वच्छता व आरोग्य मंत्री, अवंतिका स्वामी(151मते) सांस्कृतिक मंत्री, प्राची बोंद्रे(146मते) पर्यावरण मंत्री या सर्व मंत्र्यांचा शपथविधी घेण्यात आला. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या गणेश तांदळे, विराज गुरु बाळाप्पा बिराजदार, अनुश्री अजित जाधव, अविराज तुकाराम राऊत, प्रसाद बापूसाहेब गंगणे, या विद्यार्थ्यांचा तसेच मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्य गुणवत्ता आलेला साई संतोष हिंगणे, भूमिका भीमाशंकर झळके, अर्णव सिद्धेश्वर खामकर, राशी रामनाथ पवार, या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे, मार्गदर्शक शिक्षक श्री. सोमीनाथ वनवे, श्री. राहुल तोरडमल, श्री. ऋषिकेश पळसे, श्री. विक्रांत भोसले,सौ. दिपाली आरडे, श्रीमती दिपाली वाघमारे, सौ.स्वाती कदम यांचा सन्मानचिन्ह व अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. शैलेश लवांडे पोलीस उपनिरीक्षक, श्री दशरथ लवांडे माजी सरपंच शिंगापूर, पुरंदर, संस्थेचे संचालक श्री. प्रल्हाद जगताप, प्रज्ञा शिशु विहार मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली नाईक, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे, रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कविता बडेकर, पालक सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष हिंगणे सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ.दिपाली आरडे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!