ताज्या घडामोडी

एस.टी स्टॅण्डवर प्रवाश्यांचे बॅगमधून चोरी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार, हिसार, राज्य हरियाणा येथून जेरबंद, आरोपीकडून, ४,७६,७००/- रु. किमतीचे, ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत, सोलापूर शहर, गुन्हे शाखेची कामगिरी.

मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

एस.टी स्टॅण्डवर प्रवाश्यांचे बॅगमधून चोरी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार, हिसार, राज्य हरियाणा येथून जेरबंद, आरोपीकडून, ४,७६,७००/- रु. किमतीचे, ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत, सोलापूर शहर, गुन्हे शाखेची कामगिरी.

तक्रारदार नामे, परमेश्वर नरसप्पा बेले वय-५९ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. रुम नं. सी/९, मनोहर भगत, बिल्डींग, तुकाराम नगर आयरे रोड, डोंबिवली पूर्व हे नोकरी निमित्त मुंबईत राहतात, त्यांचे मुळ गांव वडगांव वाडी ता. लोहारा जि. धाराशीव हे आहे. ते, दि. १४/०५/२०२५ रोजी काही कामानिमित्त मुळगाव वडगांव वाडी, ता. लोहारा, जि. चाराशीव येथे सहकुटुंब गावी आले होते. गावाकडील कामे संपवून, ते पुन्हा दि. २१/०५/२०२५ रोजी मुंबईकडे जाणेसाठी, सोलापूर बस स्टॅण्डवर आले व सोलापूर पुणे बसमध्ये सहकुटुंब बसले तेव्हा गर्दीमध्ये दोन इसमांपैकी एक इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून, एका इसमाने त्यांचे बॅगमधील, ४,७६,७००/- रु. किंमतीचे, ९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बैंग फाडून चोरुन नेले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे, गुन्हा रजि नं. ३७०७/२०२५ भा.न्या.सं.२०२३ कलम ३०५ (सी), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता.

वयोनि/गुन्हे शाखा, श्री. सुनिल दोरगे साहेब, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास मेट दिली. सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षण केले. सपोनि शैलेश खेडकर यांचे तपास पथकातील, पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजू बाजूचे परिसरातील सी.सी.टी. व्ही कॅमे-यामधील फुटेज बाबतची तांत्रीक माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करुन संकलित केली. सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकास एका संशयीत व्यक्तीवर, संशय निर्माण झाल्याने, त्याचे बाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. माहिती संकलित करीत असताना, तपास पथकास सदरचा आरोपी हा बसस्थानकांवर चोरी करणारा, सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असून, त्याचेवर उत्तरप्रदेश या राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली.

सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने संकलीत केलेली तांत्रीक व गोपनीय माहिती या दोन्ही बाबींचा सहाय्याने पथकाने, सदरचा गुन्हा करणारा आरोपी नामे अजयकुमार बजरंगलाल सांसी, वय २६ वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. किरोरी, ता. हिसार जि. हिसार, राज्य हरियाणा हा असल्याची खात्री झाली. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकास, हरियाणा येथे तपासकामी जाणेस परवानगी दिल्याने, सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, हरियाणा राज्यातील हिसार जिल्हयातील किरोरी या गावातून, स्थानिक पोलीसांच्या मदतीने, आरोपी नामे अजयकुमार बजरंगलाल सांसी, वय २६ वर्षे, व्यवसाय मजूरी रा. किरोरी, ता. हिसार जि. हिसार, राज्य हरियाणा यास ताब्यात घेवुन, त्यांचेकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता, त्याने, दि. २१/०५/२०२५ रोजी सोलापूर बस स्टैण्ड येथे वरील नमुद प्रमाणेचा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास अटक करण्यात आली. तपासामध्ये स.पो.नि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने आरोपीकडून, त्याने चोरी केलेले, ४.७६,७००/- रु. किंमतीचे सुमारे ९५ ग्रॅम (९.५ तोळे) सोन्याचे दागिने, हस्तगत करुन, हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगाराने केलेला, सदरचा गुन्हा अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने, अविरत परिश्रम घेवून उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इसान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक पोहेकों, फरदिन शेखा तसेच सायबर पो. स्टे कढील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!