क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची बीड जिल्ह्यातील टोळी घातक शस्त्रासह जेरबंद.

मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची बीड जिल्ह्यातील टोळी घातक शस्त्रासह जेरबंद.

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्हातील पोलीस ठाणे औसा, किल्लारी भादा, रेणापूर चाकूर अहमदपूर हददीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून सदर घटना ना प्रतिबंधक करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचा तपास करणेसाठी वरीष्ठांचे मार्गदर्शनांत पोलीसाकडून कारवाई करण्यात येत होती पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा किल्लारी, भादा, रेणापूर चाकूर अहमदपूर चे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेवून रात्रीचे वेळी सतर्क पेट्रोलिंग व नाकाबंदी चे आयोजन करून रात्रग्रस्त मध्ये स्थानिक नागरीकांना सामावून घेण्यात बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

दरम्यान दिनांक ०२ ते ०३ ऑगस्ट २०२५ चे दरम्यान पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादा च्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरीकांकडून परीसरातील माहीती मिळाली की, शिवली मोड व सिंघाळा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयीतरित्या औसा तूळजापूर रोडवर फिरत आहे. अशी माहीती मिळाल्याने औसा व भादा चे रात्रग्रस्त वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरीकांचे मदतीने शिवली मोड परीसरातून ताब्यात घेतले. सदर वाहनातीलईसमांस ताब्यात घेतले त्या वाहनातून तीन ईसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले उर्वरीत पाच संशयित ईसमांना विचापूस केली तेव्हा त्यांनी त्याचे नाव

१) रिहान मुस्तफा शेख वय २० वर्षे रा. गौतम नगर, परळी ता. परळी जि. बीड

२) अन्वरखॉ जलालखॉ पठाण वय २४ वर्षे रा. गौतम नगर, परळी ता. परळी जि. बीड

३) हफिज मुमताजोददीन शेख वय ३६ वर्षे रा. आझाद नगर, परळी ता. परळी जि. बीड

४) सादेक मोहम्म्द यासिन मोहम्मद वय ४४ वर्षे रा. जुना बाजार बीड ता.जि.बीड

५) फारुख नबी शेख वय २७ वर्षे रा. बार्शी नाका, बीड असे सांगीतले

त्याचे ताब्यातील चारचाकी मालवाहू अशोक लिलाँड टेम्पो क्रमांक एमएच ४४ यू ३२९८ ची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडासाठी लागणारे साहीत्य एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडके, एक लोखंडी पार, दोन लोखंडी कटावणी, एक स्टील रॉड, एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, लाकडी दांडके दोन, एक लोखंडी पार, दोन लोखंडी कटावणी, एक स्टील रॉड, एक चौकोनी स्टीलचा पाईप, दोन लोखंडी पाईप, तीन बनावट रेडीयमचे वाहनाचे नंबर प्लेट, एक लोखंडी पट्टी,दोन स्कूड्रायव्हर, एक लोखंडी साखळी, एक ग्राइंडर मशीन, एक अशोक लिलॉड कंपनीचा टॅम्पो असा एकूण दोन लोखंडी पाईप, तीन बनावट रेडीयमचे वाहनाचे नंबर, एक लोखंडी पट्टी, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी साखळी, एक ग्राइंडर मशीन, एक अशोक लिलाँड कंपनीचा टेम्पो व चार मोबाईल जूने वापरते एकून कींमत अंदाजे 07 लाख 71 हजार 250 रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपी रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लातूर जिल्हासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

नमूद आरोपीविरूध्द पोलीस ठाणे भादा पोलीस ठाणे भादा येथे गूरन १५५/२५ कलम ३१० (४),३१० (५) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दाखल असून तपास सपोनी महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री अमोल तांबे लातूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री मंगेश चव्हाण लातूर,

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सूनिल रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, पोलीस अमलदार रामकिशन गूट्टे, हानमंत पडिले,

जमादार, मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, फड, योगेश भंडे, सचीन गुंड भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड इत्यादींनी केलीगुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील दोन पथके तपास करीत आहेत.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे नमूद दरोडेखोर घातक शस्त्रासह जेरबंद झाले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!