वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवडएकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला
मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवडएकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला
मा. पोलीस आयुक्त, कार्यालय पिंपर चिंचवड कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेचे विभागामध्ये महिन्याचे पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी “एकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येतो, या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकुण १५ टिमच्या माध्यमातुन गुरूवारी १५ शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात विषयी माहिती, व्यसनाधिनतेपासुन दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येते.
आज दि. १७/०७/२०२५ रोजी वाहतूक शाखेमार्फत १९ व्या टप्प्यात एकुण १५ टिमचे माध्यमातुन निवडलेल्या १५ शाळांमधुन सुमारे ३७२५ विद्याथ्यर्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकुण १९ टप्प्यामध्ये ३४४ शाळांमध्ये जावून ८५७५१ विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणूस बनाये या दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.
वरील उपक्रम मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड. मा. श्री. शशिकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सारंग आयाड, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून तसेच वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने आज दि. १७/०७/२०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडला. उत्फुर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. ०७/०८/२०२५ रोजी पार पडणार आहे



