गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवडची उल्लेखनिय कामगिरीमिसिंग वरून खुनाचा गुन्हा उघडकिस आणून आरोपीस गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवड यांनी घेतले ताब्यात

गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवडची उल्लेखनिय कामगिरीमिसिंग वरून खुनाचा गुन्हा उघडकिस आणून आरोपीस गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवड यांनी घेतले ताब्यात
दि. १७/०७/२०२५ रोजी इराम नामे शानु रफिक मोहम्मद शेख, रा-विलेपार्ले, मुंबई हे डी.सी २. मरक्यूरी कार्रा कंपनी, ताथवडे या ठिकाणी मुंबई वरुन स्वतःचे कारने कामानिमित्त आले होते. परंतु ते घरी न पोहचल्याने व त्यांचा मोबाईल फोन बंद येत असल्यामुळे वाकड पोलीस ठाणे, मनुष्य मिसिंग नंबर-८४/२०२५ अन्वये मनुष्य मिसिंग दाखल होती. सदरची मिसिंग ही संशयास्पद कटत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साो, गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवड यांना सदर मिरािंगया तपारा करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आमचे व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, पोहवा/प्रविण दळे, पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोशि/प्रशांत सैद, पोशि/दिनकर आडे असे सदर मिसिंगचा तपास करत असताना केलेल्या तांत्रिक विश्लेषणात असे निदर्शानास आले की, सदर इसमाचा खुन झाला असावा. तेव्हा केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे लोणीकंद पोलीस ठाणे येथे माहिती घेत असताना असे समजले की, दि. १९/०७/२०२५ रोजी लोणीकंद पोलीस ठाणे हदित पेरणे फाटा येथे भिमा नदी पात्रात एका इसमाचे शव मिळुन आल्याने लोणीकंद पोलीस ठाणे, अकस्मीत मयत क्रमांक-१११/२०२५ अन्वये एडीआर दाखल होता. तेव्हा सदर एडीआर मधील मयत व्यक्तीही शानु रफिक मोहम्मद शेख हे असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी ओळखल्याने त्याबाबत लोणीकंद पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर-३४१/२०२५ बी. एन. एस कलम १०३ (१), २३८ अन्वये वर्ग झाला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तांत्रिक विश्लेषण केले असता मयत इसमाचे संपर्कात असणान्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित इसम नामे शरद गौतम घरद, वय ३६ वर्षे, धंदा-ड्राईव्हर, रा- विजयनगर, काळेवाडी, पुणे यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, युनिट-४ चे कार्यालयात आणले होते. त्याचे कड़े मयत इरामा बाबत बौकशी केली असता तो आधी उडवाउडवीची उत्तरे देत होता. तेव्हा संशयित इसमाकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्याचे कडे विचारणा केली असता त्याने त्याया साथिदार नागे गिरीधर वाल्मिक रेडे, रा-मोई, ता-खेड, जि-पुणे याचे मदतीने मयत इसम नामे शानु रफिक मोहम्मद शेख यास फोन करुन ताथवडे येथुन लक्की बेकरी, काळेवाडी येथे बोलावुन घेतले होते. त्यानंतर मयताचे होन्डा कंपनीचे कार मधुन मयत इसमास जेवण करण्या करिता घेवुन गेले होते. त्यानंतर मयत इसमास त्यांनी दारू पाजुन दारुवे नशेमध्ये किरकोळ कारणा वरुन झालेल्या भांडणातून मयत इसमास हाताने मारहाण करुन तसेच त्याचे डोक्यात दगड घालुन त्याचा खुन करुन त्याची बॉडी मरकळ येथे भिमा नदीमध्ये मध्ये फेकुन दिली असल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झाले असुन सदरचा खुनाचा गुन्हा गुन्हे शाखा, युनिट-४ चे अधिकारी व
अंमलदार यांनी उघडकिस आणला असुन सदर गुन्हयाचे हेतु संदर्भान्ये अधिक तपारा चालु आहे. आरोपी रेकॉर्डः नेकनूर पोलीस ठाणे, बीड, गु.र. नंबर-९६/२०१८ भा.दं. वि. कलम ४९८ (अ), ३०४(अ),३२३,५०४,३४
रादरची कारवाई पिंपरी चिंचवडये पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे रागो, राह पोलीरा आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सपोआ गुन्हे-१ मा. श्री. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि भरत गोसावी, पोउपनि मयुरेश साळुंखे, सपोउपनि संजय गवारे, पोहवा प्रविण दळे, पोहता/कृणाल शिंदे, पोहवा/सुरेश जायभाये, पोहवा मोहम्मद गौस नदाफ, पोहवा नितीन दोरजे, पोहवा/भाऊसाहेब राठोड, पोशि/प्रशांत रौद, पोशि/गोविंद चव्हाण, पोशि/सुखदेव गावंडे, पोशि/अमर राणे, पोशि/दिनकर आडे, पोशि/रवि पवार, पोशि/जाधव तांत्रिक विश्लेषणाचे सपोउपनि माळी, पोहवा/ननावरे, पोशि/हुलगे, कारके यांनी केली आहे.



