भोसरी एम.आय.डी.सी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ५ यांची संयुक्त कामगीरी एम.आय.डी.सी भोसरी परीसरात घरफोडी करुन चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करुन गुन्हयातील चोरीस गेला ४०,५०,०००/- रु. किंमती मुद्देमाल केला हस्तगत
मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

भोसरी एम.आय.डी.सी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ५ यांची संयुक्त कामगीरी एम.आय.डी.सी भोसरी परीसरात घरफोडी करुन चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करुन गुन्हयातील चोरीस गेला ४०,५०,०००/- रु. किंमती मुद्देमाल केला हस्तगत
एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणे हददीतील एम. आय.डी.सी भोसरी परीसरतील ब्राईट इंडिया टुल्स नावचे दुकानातुन अज्ञात आरोपींनी ४०,५०,०००/- रुपये किंमतीचा कार्बाईड टुल्स व कार्बाईड ईन्सर्ट मटेरिअल चोरी करुन नेले होते. त्याबाबत फिर्यादी नामे बालाजी गौरीशंकर हलकुडे वय ४० वर्षे, रा. डुडुळगाव मोशी पुणे यांनी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन दि. ११/०७/२०२५ रोजी गु.र.नं. ३९६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४),३०५,३२४(४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणे व युनिट ५ गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कडील पोलीसांनी सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपी निष्पन्न करुन सदर गुन्हयातील आरोपी नामे १) हुसेनअली शोकतअली सय्यद, वय ४५ वर्षे, रा. संतोषीमाता नगर, सातपुर जि. नाशिक मुळ रा खोराषा जि. गोंडा, उत्तरप्रदेश २) सोहेल फकरुद्दीन कुरेशी, वय २५ वर्षे, रा. पिला हाऊस रंगिला चाळ, गिरगाव मुंबई मुळ रा. सरातरीन, संबळ, मुरादाबाद उत्तर प्रदेश ३) असिफ युसुफ खान, वय ३९ वर्षे, रा. नाईक नगर, एल. व्ही.एस मार्ग सायन मुंबई ४) अजमत अजगर अली, वय ४३ वर्षे, रा आपा बिल्डींग नळ बाजार, भेडी बाजार मुंबई मुळ रा. गोंड, उत्तर प्रदेश, यांचा मुंबई व उत्तर प्रदेश राज्य येथे जावुन शोध घेवुन त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेले ४०,५०,०००/- रु. किंमतीचे कार्बाईड टुल्स व कार्बाईड ईन्सर्ट मटेरिअल हस्तगत केले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे साो., मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त परि. ३ श्री. बापु बांगर, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त एम. आय. डी. सी भोसरी विभाग श्री. अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार, गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ कडील सपोनि. श्रीधर भोसले, एम. आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन
कडील पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलीस उप निरीक्षक मन्सुर मणेर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, प्रशांत सोरटे, गणेश बोऱ्हाडे, नितीन खेसे, भागपत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, उमेश सातकर, गजानन आढे, रविंद्र जाधव युनिट ५ कडील पोलीस अंमलदार प्रशांत पवार, शामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार ईघारे, तां.वि. शाखेकडील नागेश माळी, राजु जाधव, प्रकाश ननावरे, पोपट हुलगे, रमेश कारके यांनी केली आहे.
अटक आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मन्सुर मणेर करीत आहेत.



