
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील *गणेशनगर परिसरामध्ये* दिनांक – 05/08/2025 रोजी 23.00 वाजण्याच्या सुमारास हत्यारासह सदर भागात फिरून दहशत करणाऱ्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक – 546/2025, कलम – 189(2),3(5) BNS सह 4(25) हत्यार कायदा 3,7 क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यामधील सहभागी असणाऱ्या 5 विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन मा. बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचप्रमाणे गुन्ह्यामधील इतर 02 आरोपींना ताब्यात घेऊन, त्यांच्यासह घटनास्थळी जाऊन गुन्ह्याचा तपास व इतर पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात आला.
माहितीस्तव सादर.
*- वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके,*
*येरवडा पोलीस स्टेशन.*



