क्राईम

सुमारे एक महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीस केले जेरबंद

मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

सुमारे एक महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीस केले जेरबंद

दिनांक ०२/०७/२०२५ रोजी अल्पवयीन पिडीत गुलगा हा त्याचे रहाते घराजवळील सार्वजनीक शौचालय, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, पुणे येथे गेला असताना आरोपी गौरव गणेश तेलंगी अलोक, सचिन अलगुडे व बाबा पूर्ण नाव, पत्ता माहित नाही यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पिडीतास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने धारधार हत्याराने डोक्यावर, पाठीवर वार करून तसेच डावे हाताचे मनगटापासून पंजा वेगळा करून गंभीर जखमी केले म्हणून सदरबाबत शिवाजीनगर पो.स्टे. येथे गु.र.नं.९९/२०२५.भा.न्या.सं. कलम १०९,३ (५), आर्म अॅक्ट क.४/२५, महा. पो. अॅक्ट ३७ (१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील पोलीसांनी गौरव गणेश तेलंगी व अलोक सचिन अलगुडे यांना यापुर्वीच अटक केली आहे.

युनिट-१ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बाबा पुर्ण नाव, पत्ता माहित नाही याचा शोध घेत असताना युनिट-१ चे पोलीस अंगलदार हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बाबा याचे पुर्ण नाव साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान असे असून तो दिनांक ०८/०८/२०२५ रोजी रात्रीचे वेळी त्याचे मित्रांना भेटण्यासाठी अंगारशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे येणार असून त्याने लाल रंगाचा पठाणी ड्रेस घातलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने लागलीच युनिट १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अंगरशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे सापळा रचुन साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान, वय २३ वर्ष, रा.व्दारा मोहसिन शेख दत्त मंदीरा, सुखसागर, बिबवेवाडी यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून अधिक तपास करता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे गदतीने केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यमनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर कुमार घाडगे, सहा. पोलीस निरी. बर्गे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, विङ्गल साळुंखे, मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व उमेश मठपती यांचे पथकाने केली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!