क्राईम

रेकॉर्डवरील सोन-साखळी चोरी करणाऱ्या सराईत गन्हेगारांना शिताफाने पकडून, रावेत पोलीस स्टेशन तपास पथक यांच्याकडुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील ०४ गुन्हे व पूणे शहर

मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

रेकॉर्डवरील सोन-साखळी चोरी करणाऱ्या सराईत गन्हेगारांना शिताफाने पकडून, रावेत पोलीस स्टेशन तपास पथक यांच्याकडुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील ०४ गुन्हे व पूणे शहर

आयुक्तालय हद्दीतील ०२ गुन्हे असे एकूण ०६ गुन्हे उघड

रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक २७/०७/२०२५ रोजी रात्री ०८.३० वा. चे. सुमारास एस ची पाटील रोडकडून चंद्रभागा कॉर्नर नविन मंडल अधिकारी ऑफिस चे बाजुस कडे राचेत ता. हवेली जि. पुणे येथून फिर्यादी फिर्यादी हे त्यांचे दुचाकी मोटारसायकल वरुन घरी जात असतांना त्यांचे गाडी समोर अज्ञात आरोपीनी गाडी आडवी उभी करून फिर्यादी ला आडयुन त्यातील दुचाकी चालवणारा इसम खाली उतरून फिर्यादी ला शिवीगाळ करीत धमकी देवुन फिर्यादीचे गळयातील २.३ तोळे वजनाची चैन हिसकावून तोडून जबरीने चोरून घेऊन गेले म्हणन फिर्यादी नामे सागर श्याम इटकर, वय ३५, धंदा कॉन्ट्रक्टर, रा. घर क्र. ८५८, प्रगती कॉलनी, ए विकास नगर, किवळे ता. हवेली जि. पुणे यांनी रावेत पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारवरुन दिनांक दिनांक २८/०७/२०२५ रोजी गु. र. नं. ३१८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), १२६(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास रावेत पोलीस स्टेशन तपास पथकामधील पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या व तांत्रिक तपासाच्या अधारे अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करुन, सदर गुन्हयातील आरोपी नामे १) बालाजी राजु उमाप, वय २० वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, एकदिल तरुण मित्र मंडळ चे समोर, गुलटेकडी पुणे व एक विधिसंघर्षीत बालक यांना मिनाताई ठाकरे वसाहत, एकदिल तरुण मित्र मंडळ चे समोर, गुलटेकडी पुणे येथे जावुन शोध घेवुन त्यांना गुन्हयात अटक करुन, त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपी नामे बालाजी राजू उमाप यांचेकडे तपास केला असता, चोरी केलेला गुन्हयातील मुद्देमाल हा आरोपी नामे यश हरिष खड़ेकर वय २४ वर्षे रा के/ओं पाटील, चैतन्य कॉम्लेक्स, फ्लॅट नंघर डी १२, शिवदर्शन रोड, मुक्तांगण शाळा जवळ पुणे यास विकल्याचे सांगितल्याने, सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्हयातील गेला माल विकत घेतल्याचे निष्पन्न झाले असुन, सदर आरोपींतानी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील व पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) रावेत पोलीस स्टेशन गुरनं. ३१८/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०९(४), १२६(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) प्रमाणे २) चिखली पोलीस स्टेशन गुरनं. ४४५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे ३) भोसरी पोलीस स्टेशन गुरनं. २९६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे ४) एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन गुरनं. ५५५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३(५) पुमाणे ५) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर गुरनं. २१२/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) प्रमाणे ६) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर गुरनं. ३६८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३१८(४), ३५२, ३(५) प्रमाणे

चरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच अटक आरोपींताकडुन वर नमूद गुन्हयातील गेला माल -२,६०,०००/- रुपये किमतीचे ३८ ग्रॅम सोने व गुन्हयात वापरलेली ७०,०००/- रुपये किमतीची अॅक्टीव्हा मोपेडे मोटार सायकल असा एकूण ३,३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो., मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आयाड सो, पोलीस उप आयुक्त श्री. संदिप आटोळे साो, व सहा. पोलीस आयुक्त श्री. सचिन हिरे साो. रावेत पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेत पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख, सहा. पोलीस उप निरीक्षक कोळगे, पोहवा /१०७१ बोटके, पोशि/३०९२ बेंडभर, पोशि/२३४९ राऊत, पोशि/२४८६ ब्राम्हण, पोशि/२०६५ लामतुरे, पोशि/३२५५ कदम, पोशि/१६७९ विनायक देवकर यांनी केली आहे.

अटक आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास रावेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!