हत्येचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील ०४ महिन्यापासून पाहीजे असलेल्याआरोपीस गुन्हे शाखा युनिट-०३ ने कोल्हापुर येथुन घेतले ताब्यात

हत्येचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील ०४ महिन्यापासून पाहीजे असलेल्याआरोपीस गुन्हे शाखा युनिट-०३ ने कोल्हापुर येथुन घेतले ताब्यात
उत्तमनगर पोलीस ठाणे गु. र. नं. ३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९(२),११८(१),११५(२),१८९(२),१९१(२), ३५१ (३), ३५२ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (२) (३), १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपी नामे आकाश राजु बाबर वय २६ वर्ष धंदा- इव्हेंट मॅनेजमेंन्ट रा. पुण्याई अपार्टमेंन्ट, प्लॅट नंबर २१२, नांदेड सिटी रोड, पुणे याचे ठावठिकाण्याबाबत पोलीस शिपाई तुषार किंद्रे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मिळाल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार अतुल साठे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर पाहिजे आरोपी हा कोल्हापुरमध्ये राहत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठांना देवुन वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट ०३ कडील गणेश फरताडे, पो.हवा अतुल साठे, पो.शि. तुषार किंद्रे, असे पथक रवाना होवुन सदर पाहीजे आरोपीताचा टॉवर लॉकेशनच्या आधारे कोल्हापुर परीसरात शोध घेवुन त्यांस चुंबखडी, गणेशनगर, कोल्हापुर येथुन ताब्यात घेतले आहे. त्यास गुन्हयाच्या पुढील तपासकामी उत्तमनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा.श्री. पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) पुणे शहर, मा.श्री निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र मुळीक, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे पो.हवा. अतुल साठे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पो.शि. तुषार किंद्रे यांनी कामगिरी केलेली आहे.



